सातारा जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना प्रवेश नाही. 


सातारा: (सूरज बाबा घोलप )
             कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व सीमा बंद कारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
           पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी    यासंदर्भात माहिती दिली, यावेळी बोलताना सांगितले कि, सातारा जिल्हयात बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यासाठी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत देखील सर्व खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोणालाही बाहेर जात येणार नाही. तसेच जिल्ह्यातहि कोणाला येता येणार नाही.