म्हासुर्णेत नीर्जंतुकीकरण औषध फवारणी. 
              

म्हासुर्णे:- सुरज घोलप (बाबा)
             कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून म्हासुर्णे ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.सरपंच सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये गटर साफसफाई,स्वच्छता मोहीम व नीर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी सुरू केली आहे.करोना विष्णूचा संसर्ग रोखण्यासाठी म्हासुर्णे गावात सोडियम क्लोराईडची फवारणी गावाभागात ,वाडया वस्त्यावर सुरू केली आहे.यामुळे विषाणूंच्या फैलावास मज्जाव होण्यास मदत होईल. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असुन संपूर्ण संचारबंदीसह मोठा प्रतिसाद मिळत आहे.या काळात ग्रामस्थ घरात राहणे पसंत करत आहेत.ग्रामस्थांनी घराबाहेर  पडू नये यासाठी सरपंच, पोलीस पाटील, जागृत नागरिक सतर्क असुन मायणी दूरक्षेत्राचे पोलिसाही संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करत आहेत.