अशी घ्या काेराेनापासून काळजी.
सांगली:-कोरोना (COVID19) या विषाणूवर अजुनही प्रभावी लस तयार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती नाही. यावर लस तयार करण्याचा जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहे.त्यामुळेच आत्ताच्या परिस्थितीत कोरोनाची लागणच होऊ नये यासाठी आप काळजी घेणे योग्य ठरते.
भारतातही काेराेना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे
- हात साबण लावून पाण्याने नियमित स्वच्छ धुवा.
- टिश्यूपेपर वापरल्यावर तात्काळ झाकलेल्या कचरापेटीत टाका.
- डोळे, नाक आणि तोंडाला हात लावणे टाळा.
- खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका.
- रुमाल नसेल तर हात तोंडावर ठेवा किंवा कोपरातील खोबणीत शिंका.
- आजारपणाची माहिती विमान, रेल्वे किंवा बसमधल्या स्टाफला द्या.
- सार्वजनिक ठिकाणी, थुंकू नका.
- सर्दी, खोकला, ताप असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
- डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
- कच्चे, नीट न शिजलेले मांस खाणे टाळा.
- जनावरांचा बाजार, कत्तलखान्यांमधे जाणे टाळा.
- सार्वजनिक वाहनाने प्रवासात आजारी असाल तर मास्क लावा.
- खबरदारी म्हणून मास्कचा वापर करावा.
- खोकला, तापाची लक्षणे असलेल्या माणसांच्या संपर्कात येणे टाळा.
- सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे असतील तर मास्क वापरा.
- कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणाया प्रत्येकाने मास्क वापरावा.
- प्रवासाला निघण्याआधीच योग्य औषधे घ्या.
- खोकला, तापाची लक्षणे असलेल्या माणसांच्या संपर्कात येणे टाळा.
- कोरोनापासून संरक्षणासाठी साधा मास्कही पुरेसा आहे.
- मास्क एकदा वापरल्यानंतर तो बंद कचरापेटीतच टाका.
0 Comments