सांगली बस स्टॅन्ड वर आग...पळापळ...आणि सुटकेचा निश्वास..
सांगली: सांगली बस स्थानक मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वर उभ्या असलेल्या एसटी क्र-३१९७ या बसमधून अचानकपणे आग लागली व धूर येऊ लागला. हे पाहून अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांची धावाधाव सुरु झाली. आग लागल्याची सूचना अग्निशमन विभागाला देण्यात आली. काही क्षणातच अग्निशमन दलाची गाडी आणि रुग्णवाहिका बस स्थानकात दाखल झाली.पेटलेल्या गाडीतील प्रवाशांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.याघटनेनंतर एसटी प्रशासनाने माईकवरून कोणत्याही प्रकारची आग लागली नसून हे एक प्रात्यक्षिक असल्याचे जाहीर केल्या नंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
0 Comments