हातनूर मधील युवकांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधलकी.


हातनूर:शशिकांत भोरे
           कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्त पुरवठा कमी होत असल्याची शंका व्यक्त केली होती.  तसेच रक्तदान शिबीरांची आवश्यकता बोलून दाखविली होती.तसेच  राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन  आरोग्य मंत्री राजेश टोपे केले होते. त्याला प्रतिसाद देत हातनूर मधील  युवकांनी शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केले आहे.       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास अण्णा पाटील,  रवींद्र भोईटे, अमोल जमदाडे, ज्ञानेश्वर भोईटे,सूरज कुंभार यांच्यासह 66 जणांनी  रक्तदान केले.