राज्यात आजपासून दहावीची परीक्षा.
सांगली:
महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असलेली दहावीची परीक्षा मंगळवार दिनांक 3 मार्च पासून राज्यभरात सुरू होणार आहे.
एकूण 22 हजार 586 शाळांमधील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी राज्यभरात 4 हजार 981 परीक्षा केंद्रे निश्चित केली. आहेत राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,औरंगाबाद मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या विभागात दहावीची परीक्षा होणार आहे.
0 Comments