विनाअनुदानित गॅस ५३ रुपयांनी स्वस्त


मुंबई:-
         विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी) १ मार्चपासून ५३ रुपयांनी स्वस्त झाला
असल्याची माहिती इंडियन ऑईलकडून आज देण्यात
आली. त्यामुळे १४.२ किलोग्रॅम वजनाचा विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८०५.५ रुपयांना मिळणार असून, मुंबईत तो ७७६.५ रुपयांना मिळेल.मागील वर्षीच्या ऑगस्टपासून आज पहिल्यांदाच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात
घट झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ऑगस्टपासून सहा वेळा वाढ झाली होती.
विनाअनुदानित सिलिंडरचे दर रुपयांत (१४.२ किलो)


शहर        | नवे दर  |जुने दर

 दिल्ली     |८०५.५  |८५८.५
कोलकता  |८३९.५  |८९६.० 
मुंबई        |७७६.५   | ८२९.५
चेन्नई        | ८२६    |  ८८१
स्रोत : आयओसीएल