हातनूर मध्ये उद्या रक्तदान शिबीर
हातनूर :शशिकांत भोरे
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सुरु असतानाच रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे.
राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन हातनूर मधील अनेक युवकांनी एकत्र येऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हातनूर ग्रामपंचायती मध्ये शिबीराचे आयोजन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत . 29 मार्च सकाळी 10 ते 4 या या कालावधीत हे शिबिर चालणार आहे.
तरी या रक्त दान शिबिरामध्ये गावातील जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन हातनूर मधील सामाजिक कार्यकर्ते विश्वास आण्णा पाटील यांनी केले आहे.

0 Comments