पुसेसावळीमध्ये डिस्टन्सिंगची अंमलबजावणी.
पुसेसावळी:( सूरज घोलप बाबा)
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पुसेसावळी येथील सर्व दुकानदांरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत सेवा देण्यास सुरुवात केली आहे.ग्राहकही त्याचे पालन करताना दिसत आहेत.पोलिस प्रशासन सतत घसरत घालून संचारबंदीबाबत जागरुकता व नागरीकांना सतर्कतेते आवाहन करत आहे.ग्रामपंचायत प्रशासन औषध फवारणी करून ग्रामस्थांच्या आरोग्याची दक्षता घेत आहे.वेळेचे बंधन पाळून एकमेकांना सहकार्य करण्याचे प्रमाण वाढले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातही गर्दी न करता आरोग्यसेवा व गावातील अत्यावश्यक सेवेचा लाभ ग्रामस्थ घेत आहेत.दरम्यान , परिसरातील सर्वच गावात संचारबंदीमुळे शुकशुकाट आहे..
0 Comments