गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण
विटा:जगभरात फोफावत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विटा नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली. विटा शहर 21मार्च ते 23 मार्च जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
विटा नगरपरिषद कडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.विट्याच्या बसस्थानकावर परगावच्या लोकांचे येणे जाणे मोठया प्रामाणावर सुरु असते.कोरोना हा संसर्गजन्य असल्याने नगरपरिषदे कडून विट्यातील बसस्थानक,व गर्दीच्या ठिकाणाचे र्निजतुकीकरण करण्यात आले आहे.तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका.नागरिकांनी घाबरून जाऊ नये .स्वच्छता राखा.असे आवाहन विटा नगरपरिषदे कडून करण्यात आले आहे.
0 Comments