धुळवडीला लोकांची चिकन ऐवजी मटणालाच जास्त पसंती.
हातनूर:-
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या व्हारसचा परिणाम चीनमधील अनेक उद्योग धंद्यांवर झाला आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसला असून कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्राला देखील बसला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील चिकन व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या सोशल मिडियावर कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे
अनेकांनी त्याची धास्ती घेऊन चिकनकडे पाठ फिरवली. त्यामुळे लोकांनी चिकन घेण्यापेक्षा मटणच घेणे पसंद केले.
सध्या मागील एक महिन्यापासून कोरोना व्हायरस बद्दलच्या पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत आहेत. या मेसेजचा धसका मांसाहार करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे.150 किलो ने मिळणारे चिकन 70 रुपये किलो वरती आले तरी लोक 500 रुपये किलो असलेलं मटणच घेणे पसंद केले.त्यामुळे मटण घेण्यासाठी लोकांच्या मटण दुकानाच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
0 Comments