काकडी पिकाच्या उत्पादनात लक्षवेधी काम केल्याबद्दल हातनूर (ता.तासगाव,जि. सांगली ) येथील शेतकरी बाळासो पाटील यांना यावर्षीचा सेमिनिस कंपनीचा प्रसिद्ध सारथी शेतकरी हा पुरस्कार मिळाला आहे.
हातनूर चे बाळासाहेब(दाजी) पाटील सारथी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानीत
हातनूर:(शशिकांत भोरे)
हातनूर गावचे प्रगतशील शेतकरी, द्राक्ष बागायतदार श्री बाळासाहेब(दाजी)आप्पासाहेब पाटील यांनी पारंपरिक शेतीला बगल देत आपल्या शेतीमध्ये आधुनिक शेती करण्यास सुरवात केली. आपल्या द्राक्ष बागायतदार शेती बरोबर डाळींब शेती व वांगी कोथिंबीर या सारख्या पिकांचे यशस्वी असे उत्पादन आपल्या शेतीतून काढले.अश्या वेळी त्यांना त्यांचे भाऊ व कुटुंब यांची मोलाची साथ मिळते.
शेतीविषयक असणारा गाडा अभ्यास असणारे शेतीत नवनवीन प्रयोग करून विक्रमी उत्पादन काढणारे श्री.बाळासाहेब (दाजी) आप्पासाहेब पाटील त्यांना यावर्षीचा सेमिनिस कंपनीचा प्रसिद्ध सारथी शेतकरी हा पुरस्कार मिळाला असून.अश्या प्रगतशील शेतकऱ्याला हा पुरस्कार मिळाल्या बद्दल हातनूर परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.
0 Comments