जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने
३१ मार्चपर्यंत बंद राहणार


सांगली : 
          कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे नाभिक समाजाच्यावतीने सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व सलून दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ही माहिती नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल काशिद यांनी दिली. सलून व्यवसाय हा जनतेच्या जास्तीत जास्त संपर्कात येणारा व्यवसाय आहे. त्यामुळे त्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सांगली शाखेच्यावतीने जिल्ह्यातील सर्व सलून दि.२१ मार्च ते दि.३१ मार्च दरम्यान बंद ठेवत असल्याबबातचे पत्र काशिद यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी जिल्हा सचिव शरद झेंडे, कार्याध्यक्ष अशोक सपकाळ, संतोष खंडागळे, सागर चिखले,कमलावर काळे, अमित वास्के, शैलेश चव्हाण, बाळासाहेब अस्वले, शिवाजी साळुखे इत्यादी उपस्थित होते.