माहुली जमदाडे होनाई केसरीचा मानकरी;
सागर बिराजदारला केले घिस्सा डावावर चितपट

हातनूर -शशिकांत भोरे 
             हातनूर गावचे ग्रामदैवत श्री होनाई देवी यात्रे निमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पै माहुली जमदाडे ठरला 2020 च्या होनाई केसरीचा मानकरी. पै माहुली जमदाडे याने पै सागर बिराजदार याला घिस्सा डावावर चितपट करून कुस्ती शौकीनाची दाद मिळवली व होनाई केसरी चा मान मिळवला.तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती मध्ये पै.शिकंदर शेख याने पै.मनिष गुजल याला हप्ता डावावर चितपट केले तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये  पै संतोष सुतार व पै सागर डोईफोडे यांची कुस्ती बरोबरीत सोडवली.चार नंबर क्रमांकच्या कुस्ती मध्ये पै.हर्षवर्धन जाधव याने पै हंसराज पुले याला घुटना डावावर चितपट केले.पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती मध्ये हातनुर गावचा सुपुत्र पै.किशोर पाटील याने पै.सचिन मोरे ला आकडी डावावर चितपट केले.व महिला कुस्ती मध्ये हातनूर गावची कन्या पै मोनिका लोखंडे हिने पै.अश्विनी पवार हिला घुटना डावावर चितपट करून विजय मिळवला.तसेच पै.सृष्टी भोरे हिने सुद्धा मोळी डावावर विजय मिळवला.
        दुपारी 1 वाजल्या पासून श्री क्षेत्र होनाई मंदिराच्या पायथ्याशी असणारे मैदानावर कुस्तीला सुरवात झाली यामध्ये 100 रुपये पासून ते 200000 रुपये इनामाच्या कुस्त्या लावण्यात  आल्या होत्या.
यावेळी पंच म्हणून मोहन (आण्णा ) पाटील, पै आत्माराम तात्या पाटील, पै. अर्जुन दादा पाटील, पै. संभाजी लोखंडे,पै.धनाजी पाटील,पै.प्रशांत घेवारी यांनी पंच म्हणून काम पहिले.


**हार्दिक अभिनंदन**