आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये प्रा वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
विटा येथील लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा यांच्या वतीने पालकदिना निमित्त प्रा. वसंत हंकारे यांचे शनिवार दि.015/02/2020 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे हा कार्यक्रम होणार आहे.
पालकदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानात विदयार्थ्यांवर व पाल्यांवर कोणते संस्कार व ते कश्याप्रकारे करायचे जेणेकरून पाल्यांचा सर्वांगीण विकास होईल या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विटा शहराचे प्रथम नागरिक व विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.प्रतिभा ताई पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक मा.पी.टी.पाटील सर हे उपस्थित राहणार आहेत.
तरी जास्तीत जास्त पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी केली आहे.
0 Comments