वाढदिवसादिवशी शिकलेल्या शाळेतील शिक्षकांचा सत्कार

महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील सर यांचा वस्तुपाठ


 हातनूर:
            वाढदिवसासाठी मेजवान्या, पार्टी यांना फाटा देत आपण ज्या शाळेत शिकलो, त्या सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्याचा नवा वस्तुपाठ जिल्हा परिषद शाळा हातनूर चे शिक्षक शशिकांत पाटील यांनी घालून दिला.
      आपण ज्या शाळेमध्ये  लेखन-वाचन शिकलो त्या शाळेमधील शिक्षकांचा आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या कुटुंबापेक्षा ही मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांच्या समोर व समाजासमोर आदर्श असावा आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शिक्षकांचे आशीर्वाद  लाभावेत यासाठी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
         यावेळी शाळेनेही रोपटे देऊन  शशिकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व या वृक्षाप्रमाणेच आपली सामाजिक, शैक्षणिक कारकीर्द उत्तरोत्तर बहरत जावी असे शुभाशीर्वाद सर्व शाळा परिवारातील शिक्षकांनी दिले.
          यावेळी त्यांचे शिक्षक असलेले  वसंतराव पाटील यांनी विद्यार्थी दशेतील सरांचे अनुभव विद्यार्थ्या समोर कथन केले व त्यांचा आदर्श घेऊन आपापल्या क्षेत्रांमध्ये प्रगती करावी अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.
           यावेळी माजी मुख्याध्यापक
उत्तम बापू साठे, विद्यमान मुख्याध्यापक सुरेश संपतराव पाटील,वसंत आकाराम पाटील,
महादेव शिवाजी जंगम,प्रमोद सुरेश कदम,कलावती केशव कदम,शशिकला हणमंत पाटील,सुनिता रवींद्र कुंभार,ज्योत्स्ना विजयकुमार पाटील,वैशाली दिनकर पवार, ज्योती प्रकाश कापसे  या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 
          माझ्या मातृभूमी मध्ये आणि मी शिकलेल्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार हाच माझा वाढदिवस असे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील यांनी काढले. आभार  प्रमोद कदम यांनी मानले