आदर्श पब्लिक स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त पारंपरिक वेशभूषेचे दर्शन
विटा:-२७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्वत्र साजरा केला जातो. आदर्श पब्लिक स्कूल मध्ये हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. या दिनानिमित्त प्रसिद्ध कथाकथनकार मा. प्राध्यापक श्री. विश्वनाथ गायकवाड प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ते म्हणाले रडवणे फार सोपे असते परंतु एखाद्याला हसवणे फार अवघड, त्यांनी ‘चिवळ्याचे लग्न’ लिहिलेली ग्रामीण कथा प्रस्तुत केली या कथेमधील धमाल सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवली.
या प्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री दत्तप्रसाद मिठारी, मराठी विषय प्रमुख श्री. संदीप कार्वेकर, समन्वयक सौ. राजश्री चव्हाण, श्री. जयदेव मोहिते, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या दिनानिमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून दिंडीची सुरुवात केली ढोलताशाच्या गजरावर परिसर दुमदुमून गेला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘अक्षरदालण’ यांच्या वतीने भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेमध्ये आले होते. दिपप्रज्वलन, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमामध्ये कु. वृशाली लेंगरे, कु. कार्तिकी पाटील यांनी भाषण केले, तर “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” हे गीत मधुरा, श्रेया, कार्तिकी, जान्हवी यांनी गायले, तर ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली या लावणी गीतांनी जल्लोष केला. कुमारी हर्षदा भागवत , प्रणिता शेटे, जान्हवी समुद्रे, मृणाली पवार यांनी सदाबहार गीतांचे नृत्य सादर केले. तर प्रणिता लवटे ग्रुपने शेतकरी गीत सादर केले. निशाद कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर करून मानाचा मुजरा दिला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन कार्यकारी संचालक पी. टी. पाटील सर, प्राचार्य श्री. दत्तप्रसाद मिठारी यांनी केले तर नियोजन मराठी विभागातील सहाय्यक शिक्षिका सौ. रश्मी शेळके, सौ. सपना पाटील, श्री.किरण माने, श्री. सतीश सदाकळे यांनी मोलाची भूमिका निभावली आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका कुमारी स्वाती भिंगारदेवे यांनी केले तर सूत्रसंचालन कुमारी राजनंदिनी राजे व मधुरा सुतार यांनी केले.
0 Comments