आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन मोठया उत्साहात साजरा

विटा:-
            लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.व त्यानिमित्ताने शाळेत  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
          या प्रदर्शनाचे उद्धघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी केले.
         या प्रदर्शनामध्ये आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मधील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.
          विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे आपल्या कल्पना शक्तीला वाव देऊन कलात्मक मॉडेल व प्रतिकृती  बनवल्या  होत्या.या प्रदर्शनामध्ये  सुमारे 50  विविध प्रकारचे प्रयोग व प्रतिकृतीची मांडणी करण्यात आली होती.यामध्ये डोअर बेल, लाय फाय, मशीन, कुलर,वाटर आलार्म, विद्युत चुंबक अशी विविध उपकरणे विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
         शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी बनवलेली प्रतिकृती व मॉडेल विषयी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.व या  प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे कौतुक केले.
           शाळेतील विदयार्थ्यांना  सिंजू भोसले मॅडम, शितल गायकवाड मॅडम, या शिक्षकांचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले.
           या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वाचे कौतूक केले व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.