जि.प.शाळा हातनूर मध्ये विविध उपक्रमांतून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.
विज्ञान दिनानिमित्त हातनूर मधील जिल्हा परिषद शाळा हातनूर मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जिज्ञासूवृत्तीचे दर्शन घडवले.
भारतीय वैज्ञानिक सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशकणांचे विकीरण या संशोधनासाठी नोबेल परितोषिक जाहीर झाले होते. हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावेत, यासाठी जि.प.शाळा हातनूर शाळेतर्फे आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये प्रदर्शनामध्ये शाळेतील विदयार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज, इलेक्ट्रिक कटर, घनता असलेल्या पाण्यात लिंबू तरंगतो, फुग्यामध्ये पाणी असल्यास फुग्याला आग लागत नाही, हवेचा एक सारखा दबाव असे नाविन्यपूर्ण प्रकल्प मुलांनी सादर केले.
हातनूर जिल्हा परिषद शाळेला 15 लाख रुपयांची नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध झाली असून त्यामधील विविध प्रयोग हे माझी शाळा अभियानाचे शशिकांत पाटील व पदवीधर शिक्षक वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिकवले जातात
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेंतील विज्ञान पदवीधर शिक्षिका वैशाली दिनकर पवार यांनी केले होते.
मुख्याध्यापक सुरेश संपतराव पाटील,महादेव शिवाजी जंगम,प्रमोद सुरेश कदम,कलावती केशव कदम,शशिकला हणमंत पाटील,
सुनिता रवींद्र कुंभार,ज्योत्स्ना विजयकुमार पाटील, ज्योती प्रकाश कापसे यांनी संयोजन केले
0 Comments