हातनूर गावच्या यात्रेला आजपासून सुरुवात.
जंगी कुस्त्यांचे आयोजन 


हातनूर:
       हातनूर गावचे ग्रामदैवत श्री होनाई देवीच्या यात्रेला  आज शनिवार दि. 8 फेब्रुवारी  व रविवार दि. 9 फेब्रुवारी भरत असून या यात्रेनिमित्त यात्रा  कमिटी हातनूर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
सायंकाळी 6:15 वाजता  देवीचा  नैवेद्य व पालखी  सोहळाला सुरवात  होणार आहे. रात्री 8 वाजता सम्राट दत्तोबा तिसंगीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
             रविवार दिनांक 9 फेब्रुवारी ला दुपारी 2 वाजल्या पासून श्री क्षेत्र होनाई मंदिराच्या पायथ्याशी असणारे  मैदानावर कुस्तीला सुरवात होईल. यामध्ये 100 रुपये पासून ते 200000 रुपये इनामाच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार दि 9 फेब्रुवारी रात्री 9:15 वाजता गंगाधर म्युजिकल नाईट ऑकेस्टाचे आयोजन करण्यात आले आहे.