आदर्श स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचे नृत्य स्पर्धेत यश :जिल्हास्तरीय निवड

 

विटा:
            दि.07/02/2020 रोजी लोकमत बालविकास मंच आयोजित आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील जवळ जवळ 40 शाळेतील  विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटाच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत व  नयनरम्य नृत्य  सादरीकरण करत  प्रथम  क्रमांक मिळवला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
        या मध्ये कु.मेघना धनवडे (इ 5वी), कु.अनुष्का कांबळे (इ 5वी), कु.हरेकृष्ण निकम (इ 6वी ), कु संदीप पाटील (6वी )कु रोहित पवार (6वी ) कु.निखिला शिंदे (6वी ) कु.सोनिया पवार (6वी ) कु सोहंम कुलकर्णी (6वी ) ऋषिकेश निकम (6वी ) समीक्षा कांबळे (6वी )धिरज पवार ( 7वी)  श्रुती मुनगुत्ते (7वी ) या विद्यार्थ्यांनी नयनरम्य नृत्य सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला.
          या विदयार्थ्यांना नृत्यदिग्दर्शक  अजित  सर  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले 
         या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.