12 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आले.
जुन्या आठवणींना उजाळा
डोळ्यांसमोर भूतकाळात रमताना शाळेच्या गोड आठवणींशिवाय दुसरं काहीच नसत हे नक्कीच खरं आहे. अनेक वर्षानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या आठवणींत रमून जातो, तेव्हा आपल्याला आपला भूतकाळ नक्की हवाहवासा वाटत असतो. उज्वल विद्यामंदिर हातनुरच्या 2007-08 च्या दहावी बॅच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवनींना उजाळा दिला.
शाळेतील 2007-08 च्या १० अ आणि ब बॅचच्या विध्यार्थ्यांचा स्नेहसंमेलंन सोहळा पार पडला शालेय मित्रांना भेटण्याची उत्सुकता घेऊनच हे विद्यार्थी या वेळी भेटले. शालेय जीवनातील आठवणी यानिमित्ताने पुन्हा एकदा जाग्या झाल्या. 12 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा सगळे भेटलो याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ‘पुन्हा एक दिवस शाळेचा’ अनुभवला. अगदी शाळेच्या वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टीना उजाळा देऊन या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले.
या कार्यक्रमाचे नियोजन महेश खुजट, गणेश घेवारी, प्रियंका साळुंखे, अमोल जमदाडे, संदीप पाटील, भाग्यराज पाटील, यांनी केले होते.
मागील वर्षी 2006-07 च्या शाळेतील च्या १० अ आणि ब बॅचच्या विध्यार्थ्यांचा स्नेहसंमेलंन सोहळा पार पडला होता. त्यांची ही परंपरा यावर्षी 2007-08 च्या बॅच ने कायम राखली.
0 Comments