आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये जागतिक  मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा
विटा:-
          लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये जागतिक मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा. सुनीता रोकडे मॅडम व  शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांच्या  हस्ते  सरस्वती देवी, कवी कुसुमाग्रज व  लोकनेते. हणमंतराव  पाटील साहेब याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
           या कार्यक्रमामध्ये शाळेतील विदयार्थ्यांनी कु.श्रुती मनगुत्ते (इ -7वी ) व कु.सरस्वती पवार (इ -7वी) यांनी मनोगत व्यक्त केले. तसेंच शाळेंतील अन्य विद्यार्थ्यांनी मराठी नाटक,कविता, गीत व व नृत्य सादरीकरण केले.व त्या माध्यमातून मराठी मातृभाषेचा अभिमान व मराठी भाषेचे महत्व चांगल्या प्रकारे पटवून दिले. तसेच कार्यक्रमाआधी शाळेतून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीत शाळेंतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता.
          कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यां प्रा.सुनिता रोकडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी राज्य भाषा दिन म्हणेज काय व मराठी भाषेचा अभिमान का असावा व ज्याप्रमाणे आपली आई आपणास प्रिय असते त्याच प्रमाणे आपली मातृभाषा आपणास  प्रिय असते. या विषयी सुंदर असे मार्गदर्शन केले.
           शाळेच्या मुख्याध्यापिका  अंजुम बागवान मॅडम यांनीही
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
  अश्या सुंदर शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
                 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत भोरे सर  यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.पुष्पा निकम मॅडम यांनी केले.
                या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वाचे कौतूक केले व जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.