आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये इ 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप.
विटा:-लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये इयत्ता 10 चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी.पाटील सर व आदर्श कॉलेज ऑफ बी.फार्मसी चे प्राचार्य महाजन सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान यांच्या हस्ते सरस्वती देवी व लोकनेते मा.हणमंतराव पाटील साहेब याच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी.पाटील सर हे होते.व प्रमुख पाहुणे आदर्श कॉलेज ऑफ बी.फार्मसी चे प्राचार्य महाजन सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान( मॅडम) हे होते.
या निरोप समारंभ मध्ये इयत्ता 10 वी तील विदयार्थ्यांनी कु.साक्षी शेळके,कु.साक्षी मोरे, कु.अंजली जाधव या विद्यार्थ्यांनींनी मनोगत व्यक्त केले.
''घेताना आज निरोप शाळेंचा, आले भरूनिया डोळे, 10 वर्षातील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने''अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या पदापर्यंत कसे पोहचाल त्या दुष्टीकोनातुन अभ्यास करा व एक चांगल्या पदावर पोहचा यासाठी व परीक्षेसाठी यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच आदर्श बी फार्मसी चे प्राचार्य महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही आधी एक चांगला माणूस बना.व आपल्या मध्ये चांगले गुण घ्या जेणे करून तुमचा व तुमच्या गुणाचा गौरव होईल.व जीवनात एक यशस्वी व्यक्ती बना यासाठी व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर असे मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्यांचे जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक यावे तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकावे व विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त व्हावी यासाठी व शाळेची 100 % निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवावी यासाठी व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रेया यादव व कु प्रिया थोरात (इ-9वी ) यांनी केले व आभार प्रदर्शन कु.निकिता कदम (इ-वी) हिने केले
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी तील सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेंतील शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वाचे कौतूक केले.
0 Comments