हातनूर मध्ये  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.


  हातनूर:-शशिकांत भोरे
           हातनूर मध्ये शिवछत्रपती महाराजांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली.
            हातनूर मधील शिव स्वराज्य मित्र मंडळ आणि शिवजयंती उत्सव समिती हातनुर मंडळाने ३९० वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यावेळी शिवजयंती उत्सव समिती हातनुर मंडळाचे अध्यक्ष  विश्वास आण्णा पाटील व संतोष पाटील यांनी यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व शिवरायांना अभिवादन केले.यावेळी मधुकर तात्या पाटील, जाधव गुरुजी, संजय पाटील , शंकर कदम,श्रीधर कदम,  लक्ष्मण माने,व  इतर शिवप्रेमी युवक  उपस्थीत होते.
         तसेच हातनूर मधील ग्रामपंचायत  कार्यालय येथे शिवरायांच्या प्रतिमेस  पुष्पाहार अर्पण करून सरपंच सौ.कमळताई घेवारी यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत मोहन आण्णा पाटील(माजी.जि.प सदस्य), विश्वास आण्णा पाटील,सौ.आशाताई पाटील(माजी सरपंच),शशिकांत पाटील,मयूर सपकाळ आदी उपस्थित होते.