हातनूर ग्रामपंचायतीची थकीत कर वसुली साठी विशेष मोहीम.
        

तासगाव:-
             हातनूर ग्रामपंचायतीची मालमत्ता कर पाणी पट्टी वसुली संकलनाची मोहीम गेल्या पंधरवड्यापासुन जोरात सुरु असुन अनेक करदात्यांनी वार्षिक कराची द्येय रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केली आहे.परंतु गेल्या काही वर्षांची थकीत कर देय रक्कम ज्यांनी जमा केलेली नाही त्यांचे घरी जाऊन स्वतः कर्मचारी वसुल करत आहेत.
               त्याचप्रमाणे कर भरण्याचे आवाहन करित आहेत 31 मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने वार्षिक कर संकलनाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी ग्रामसेवक व सरपंच  यांनी या महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केले असुन लोकांनी थकीत कर लवकर भरावा यासाठी वसुली पथक तयार करण्यात आले आहे.व त्या वसुली पथका द्वारे लोकांनी थकीत कर लवकर भरावा यासाठी लोकांमध्ये जनजागरूकता करण्यात येत आहे.जे थकबाकी दार कर भरणार नाहीत अश्या लोकांची नळ कलेक्शन तोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.त्यामुळे ज्या नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी पट्टी कर भरला नसेल त्यांनी तो त्वरित  ग्रामपंचायती मध्ये भरुन सहकार्य करावे असे आवाहन  ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.