' व्हँलेंटाईन डे' ला गुलाब फुलला.
सांगलीतील बाजारपेठा फुलांनी सजल्या
सांगली:-
प्रेमाचा दिन म्हणून व्हँलेंटाइन डे ला जगभरातून मान्यता मिळत आहे.अगदी गावापासून ते मोठ्या शहरातील तरुणाई 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.त्यात सांगलीतील तरुणांई ही या प्रेम दिनाचे स्वागत मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे.मनातील प्रेमाचे उत्कट भाव हळूवार पणे व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे व्हँलेंटाइन डे'.या दिवशी गुलाबाच्या साक्षीने आपल्या भावना प्रकट करतात.
अश्या या गुलाबी दिनाचे स्वागत करण्यासाठी विविध प्रकारच्या गुलाबानी सांगली शहरातील दुकाने सजली आहेत.त्यात नुकतेच परदेशी गुलाब बाजारपेठेत दाखल झाली असून सांगलीच्या तरुणांई मध्ये त्याबाबत प्रचंड उस्तूकता निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातून विविध भागातून गुलाबाची फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.अनेक फुलविक्रेत्याकडे डच रोझ, रेड रोझ, पिंक रोझ, असे विविध प्रकारचे गुलाब विक्रीस आले आहेत.
शहरातील तरुणाई मध्ये डच रोझ व रेड रोझ खरेदी वर जास्त कल असल्याचे दिसून येत आहे.
सध्या 7 तारखे पासून प्रपोज डे पासून व्हँलेंटाइन डे' ची धूम सुरू झाली असून यानिमित्ताने सांगलीत नेहमी 10 ते 15 रुपये असणाऱ्या गुलाबाच्या एका नगाची दर 30 ते 40 रुपये अशा झाली आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त प्रेमीकांचा गुलाबाच्या फुलांना जास्त मागणी असल्याने यांचा फायदा घेत या फुलांचे दरही त्यानुसार वाढवण्यात आले आहे.
0 Comments