आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा संपन्न
मा.लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटामध्ये शालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम या होत्या.
या स्पर्धेमध्ये इयत्ता 1ली 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.त्यामध्ये इयत्ता पहिली ते तिसरी , चौथी ते सहावी, सातवी ते नववी असे गट करण्यात आले होते व त्या गटामध्ये प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्यांने भाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासा बरोबरच त्यांच्यामधील सुप्त गुणांना विकसित करणे,व त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन शिंदे,स्नेहलता सकटे, संगीता कोळी यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी यांनी केले होते.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वांचे कौतुक केले.
0 Comments