आदर्श स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचे वादविवाद स्पर्धेत यश
विटा:- दि.07/01/2020 रोजी भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल विटा.याच्या वतीने स्व.मा.पतंगराव कदम (साहेब )याच्या जयंती निमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विट्यातील 6 शाळेतील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटाच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. यामध्ये कु.सैफ शिकलगार (इ 9वी) कु.अंजली जाधव (इ 10वी ) या विदयार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेत चांगली कामगिरी करून उल्लेखनीय यश मिळवले. या विदयार्थ्यांना रघुनाथ पवार सर व सिंजू भोसले मिस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments