आदर्श स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय मास्टर अबॅकस स्पर्धेत चमकदार यश
विटा:-
दि.29-12-2019 रोजी अल्फोन्सा इंग्लिश मिडीयम स्कूल इचलकरंजी येथे राज्य स्तरीय मास्टर अबॅकस स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत लोकनेते मा.हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटाच्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवले.
त्या स्पर्धेत K-4 Level मध्ये कु.सुफीया शेख (इ 7वी) व कु.प्रणाली काळसेन (इ 7वी ) या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकिवला तसेच कु.तनुजा शिंदे (इ-5),कु.अलफिया शेख(इ-5) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर कु सौजन्या पाटील (इ-7वी) हिने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच k2 level मध्ये कु.समर्थ भोसले (इ-4थी ) याने द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी संचालक मा.श्री.पी.टी.पाटील (सर ) व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना अबॅकस प्रशिक्षक कणसे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments