बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह ९ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू 

अमेरिका:-
             लॉस एंजलिसपासून सुमारे ४0 किलोमीटर अंतरावर दाट धुके असताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.ते  हेलिकॉप्टर कॅलिफोर्नियाच्या दिशेने जात होते. या दरम्यान हवेतच हेलिकॉप्टरला आग लागली. हे हेलिकॉप्टर कोब्री ब्रायंटच्या मालकीचे होते. आग लागून हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर बचाव पथकाला बचावकार्य करताना मोठा अडथळा झाला. या अपघातातून हेलिकॉप्टरमधील कुणीही वाचलेली नाही.त्या मध्ये त्याचासह तिची 13 वर्षीय मुलींचा ही मृत्यू झाला.
           ब्रायंट याने स्वतःचे टोपणनाव ब्लॅक मांबा असे ठेवले होते. त्याने नॅशनल बास्केटबाल असोशिएशनमधून २०१६ मध्ये निवृत्ती घेतली होती. तो नॅशनल बास्केटबॉल असोशिएशनमध्ये २1 वर्षे सक्रिय होता. त्याने या काळात पाच चॅम्पियनशीप जिंकल्या होत्या.
त्यामुळे अशा महान खेळाडू च्या निधनाने क्रिडा जगतात दुःख व्यक्त केले जात आहे.