देवळा : मेशी बस रिक्षाचा अपघात;अपघातातील मृतांची संख्या २५ वर.
नाशिक:-
मेशी येथे एसटी बस व रिक्षा यांच्यात धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी शिवारात मंगळवारी (दि.२८) भीषण अपघात झाला होता. घटनास्थळी बचावकार्यादरम्यान मध्यरात्री आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामुळे मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे. तर या अपघातात ३६ जण जखमी झाले आहेत. मालेगाव येथील अग्निशमन विभागाचे अधीक्षक एस. डी. पवार यांनी ही माहिती दिली आहे. एनडीआरएफने घटनास्थळी येऊन बचावकार्य केले.
सौंदाणे-देवळा रस्त्यावरील मेशी शिवारात मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. कळवण आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८४२८) मेशी शिवारात समोरून येणार्या अॅपेरिक्षाला जोरात धडकली. बस-रिक्षाची धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहने रस्त्याच्या जवळच असणाऱ्या ६० फूट खोल विहिरीचा कठडा तोडून त्यात पडली. विहिरीत रिक्षाच्या वर बस कोसळल्याने रिक्षातील प्रवासी दबले गेले. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
0 Comments