परिस्थिती वर मात करून शिक्षणासाठी चढते राजगड
पुणे:प्रतिनिधी
एक चिमुकली इयत्ता दुसरीत शिकत असणारी मुलगी तिच्या शिक्षणासाठी व वह्या पुस्तके घेण्यासाठी चढते राजगड.
ती मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात.जेमतेम सात ते साडेसात वर्षांची. राहणार पाली गावची.तिचे घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने गड चढत जाते.ज्या गडावर पाण्याच्या 2 बाटल्या घेऊन चढणे अवघड जाते त्या गडावर ही मुलगी पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या डोक्यावर घेऊन चढते. व तिथे येणाऱ्या शिव प्रेमीना ती सरबत,पाणी, ताक विकते.तिची ही धडपड फक्त आणि फक्त शाळेसाठी. शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते.
आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु परिस्थिती वर मात करून शिक्षणासाठी ती चढते गड.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यावर विजय मिळवणे ही शिवरायांची शिकवण ती शिवकन्या सार्थ ठरवत आहे.
0 Comments