कोल्हापूर मध्ये पद्मा टॉकीज ला अजय देवगणच्या एन्ट्री ला नोटांचा पाऊस

 कोल्हापूर:
                तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण शाळेंत असल्यापासून वाचत आलो आहोत. हीच कथा अतिशय भव्यरित्या तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
         या चित्रपटाच्या वेळी कोल्हापूरमधील  पद्मा टॉकीज ला अजय देवगणच्या एन्ट्री ला त्याचा फॅन्स नी नोटांचा पाऊस पडला. तान्हाजी- द अनसंग वॉरियर' मध्ये अजय देवगण नी केलेला अभिनय त्याचा फॅन्स ला एवढा आवडला आहे की त्यांनी चक्क पैसाचा पाऊस पडला.