टीम इंडियाच्या 87 वर्षीय सुपरफॅन चारुलता पटेल यांचं निधन
भारतीय क्रिकेट संघांचे चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर प्रत्येक सामन्यावेळी आवर्जुन असतात.त्यातील एक अनोखा चाहत्यांमध्ये 87 वर्षीय चारुलता पटेल यांचा समावेश होता.त्या इंग्लड मध्ये स्थायिक झाल्या होत्या.काल त्यांचे वृद्धापकाळ निधन झाले.त्या
इंग्लंडमध्ये 2019साली पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरी पर्यंत मजल मारता आली.वर्ल्ड कप विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली होती आणि त्यांच्या प्रत्येक सामन्याला तुफान गर्दी जमली होती. भारतीय चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर आवर्जुन उभे होते आणि याच चाहत्यांमध्ये 87 वर्षीय चारुलता पटेल यांचा समावेश होता. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती.
0 Comments