तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ची घौडदौड सुरूच, लवकरच 200 कोटीचा मोडणार रेकॉर्ड
तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट लवकरच 200 कोटी क्लबमध्ये एंट्री करणार आहे.
अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले आहे. हा चित्रपट लवकरच 200 कोटी क्लबमध्ये एंट्री करणार आहे.
दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच दोन्ही चित्रपटांच्या टीमने आपापल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण तरीही 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाची चांगलीच घौडदौड सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.9 कोटी, शनिवारी 20.5 कोटी, रविवारी 27 कोटी आणि सोमवारी 12 कोटी इतकी कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 176 कोटी कमाई केली असून हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.
आगामी दिवसांत 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.
0 Comments