आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मध्ये  क्रीडा  सप्ताह उत्साहात संपन्न



विटा:
 येथील.मा.लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, आदर्श पब्लिक  स्कूल स्टेट बोर्ड विटा यांचा क्रीडा सप्ताह   उत्साहात संपन्न.
यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन आदर्श कॉलेज ऑफ बी.फार्मसी चे प्राचार्य महाजन सर, व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मँँडम यांच्या हस्ते झाले.
सन 2019-20 च्या क्रीडा सप्ताहात शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते,त्यात मोठ्या मुलांसाठी कबड्डी, क्रिकेट,रस्सीखेच, अशा सांघिक खेळांचे नियोजन केले होते.तसेच लहान मुलांसाठी लेमन स्पून,  लंगडी, डॉज बॉल, धावणे असे खेळ घेतले.सर्व विद्यार्थ्यांनी खेळात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.संघभावना, जिद्द व एकता याचा सुरेख संगम विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळाला.
 यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री.पी.टी.पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मँँडम यांनी मार्गदर्शन केले.क्रीडाशिक्षक संजय गायकवाड सर व पवार सर व शिक्षक इतर  
कर्मचारी यांनी नियोजन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बागवान मॅडम यांनी सर्वांचे कौतुक केले.