विटा-वाळूज एसटी उलटली, 38 विद्यार्थी जखमी

सांगली :- प्रतिनिधी
 विटा-वाळूज या एसटी बसला झालेल्या अपघातात 38 शालेय विद्यार्थी जखमी झाले सर्व जखमी मुलांवर विटा ग्रमीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही बस विटा आगाराची असून. समोरून येणार्‍या वाहनाला  जागा देण्याच्या प्रयत्न करत असताना रस्त्याच्या कडेचा भराव खचला आणि बस घसरून रस्त्याच्या कडेला उलटली. देवनगर परिसरातील एका वळणावर हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विटा ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विद्यार्थ्यांची विचारपूस केली