Barclay's कंपनीतील तरुणांनी पूरग्रस्तांना मदत करून जपली समाज बांधिलकी

सांगली:-प्रतिनिधी
 पुण्याला हिंजेवडी आय टी पार्क येथील Barclay's कंपनी मध्ये काम करणारे तरुण व फॅसिलिटी - security टीम पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आली.या टीममधील सदस्यांनी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत मदत केली होती.व त्या जमा झालेल्या पैसामधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळापयोगी साहित्य खरेदी करण्यात आले. व ते साहित्य अमित पाटील ,सचिन खरात,प्रशांत जावीर, कैलास पवार आणि किरण चव्हाण यांनी प्रत्यक्षात पूरग्रस्त गाव सुखवाडी, ता. पलूस, जिल्हा- सांगली, येथे जाऊन तेथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले .त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा समावेश होता, त्यामध्ये शाळेची पाटी, पाटीवर लिहिण्यासाठी लागणारी पेन्सिल, एक पेन, वही, इंग्रजी शब्दासाहित प्रत्येक मराठी शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारी अंकलिपी,चित्रकला वही, चित्रे रंगवण्यासाठी लागणारे रंगीत खडू,पेन्सिल, खोडरबर, शार्पणर,प्लास्टिक स्केल,आणि महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी लागणारे प्लास्टिक फोल्डर अशा स्वरूपात देण्यात आले,त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्या मदत करण्याऱ्या टीम मधील अमित पाटील,सचिन खरात व  टीम सदस्यांच्या पैशाचे खऱ्या अर्थाने चीज झाले.
 ही मदत देतावेळी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत मधील सदस्य,सरपंच उपसरपंच आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते, त्यावेळी केलेल्या मदती बद्दल शाळाकडून व ग्रामपंचायत यांच्या कडून अमित पाटील व त्यांच्या  टीमला आभारपत्र  देण्यात आले व त्यांचे आभार मानले