पूरग्रस्त सांगलीत मदतीसाठी आलेल्या लातूरच्या पशुरोगतज्ञाचा मृत्यू
लातूर -सांगलीतील पूरग्रस्त भागातील जनावरांवर उपचार करण्यासाठी सांगलीत लातूर हून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आले होते त्या पथकामधील पशुधन पर्यवेक्षक नारायण खरोळकर यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटकाने निधन झाले. ते लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दु:ख दिलगिरी व्यक्त केली .
कोल्हापूर, व सांगली जिल्ह्यात पुराच्या तडाख्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला.आणि जी बचावलेली जनावरे होती ती साथीच्या आजारांना बळी पडू नयेत यासाठी सरकारने राज्यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त भागात मदतीसाठी पाठवले आहे. लातूर जिल्ह्यातून गेलेल्या पथकात खरोळकर यांचा समावेश होता. ते चार दिवसांपूर्वी सांगलीत दाखल झाले होते. शनिवारी सकाळपासून मिरज तालुक्यातील पूरग्रस्त गाव नांद्रे आणि कर्नाळ येथे त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली. त्यांनी अनेक जनावरांवर उपचार केले. त्यानंतर ते सायंकाळी सांगलीत मुक्कामाला गेले. मात्र, रविवारी पहाटे त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
0 Comments