लांडग्याच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार
आटपाडी :-वार्ताहर
हिवतड (ता:-आटपाडी)येथे गुरुवारी रात्री लांडग्यानी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला.यात ४५ मेंढ्या व शेळ्या ठार झाल्या.
या मेंढ्या कोल्हापूर जिल्ह्यातील असून ते हिवतड येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात बसले होते.गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ लांडग्यानी कळपावर हल्ला केला.यात ४५ मेंढ्या व शेळ्या ठार झाल्या आहेत.यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
या आधी पण लांडग्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे मेंढ पालन करण्याऱ्या शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे.
0 Comments