महाराष्ट्रात शुक्रवारी किंवा शनिवारी लागू शकते आचारसंहिता ?
सांगली :प्रतिनिधी
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा हे मंगळवारी मुंबईत येत असून ,त्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होईल.व त्यानंतर शुक्रवारी किंवा शनिवारी महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.अरोरा यांच्यासह आयोगाचे चार उपनिवडणूक आयुक्त आणि महासंचालक मंगळवारी मुंबईत येणार आहेत.त्यानंतर बुधवारी सह्याद्री अतिथिग्रहात निवडणूकी संदर्भात राज्यातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.तसेच जिह्याचे जिल्हाअधिकारी व जिल्हा पोलिसप्रमूख यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.त्यामूळे राज्यात शुक्रवारी किंवा शनिवारी निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
0 Comments