म्हासुर्णे प्रतिनिधी तुषार माने
             करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात आरोग्य यंत्रणा कायमच आघाडीवर आहे. राज्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर या परिस्थितीत बंदोबस्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना पुसेसावळी येथील मा.समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे आप्पा यांनी सेफ्टी किटचे वाटप केले.
          खते, बि बियाणेचा व्यवसाय करीत असताना आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेने माळवे यांच्या कडुन सामाजिक कार्य जोपासले जात आहे. तरी सद्या निर्माण झालेली कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन 
       त्यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांना सेफ्टी किटचे वाटप केले. किट मध्ये उच्च उत्तम दर्जाचे मास्क
 ,हँण्डग्लोव्हज्,सँनिटासझर,गॉगल तसेज निर्जतुकीकरणासाठी आवश्यक असणारा औषधे फवारणीचा पंप अशा अनेक प्रकारच्या वस्तु कर्मचाऱ्यांना किट मध्ये दिल्या.

        पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दवाखान्याच्या बाहेर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हॕण्डवॉश स्टँण्ड करण्याचा माणस माळवे यांचा आहे. निमसोड परिसरातील अनेकजणांनी असे उपक्रम राबवावेत कोरोना बाबतचे नियम काटेकोरपणे पाळुन प्रशानाकडून दिलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन पुसेसावळीचे सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण मा.सभापती मानसिंगराव माळवे  यांनी केले.
        यावेळी पुसेसावळीचे युवा नेते उद्योजक संग्राम माळी,म्हासुर्णे ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,मधुकर माने डाॅ.प्रियांका पाटील ,डॉ.भंडारे साहेब,डॉ.संजय जौंजाळ साहेब डॉ.औबासे साहेब,डॉ.कुंभार साहेब प्राथमिक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तरी या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.