ब्लड डोनर सातारा संस्थेचा तिसरा वर्धापनदिन
 रक्तदान केल्यानंतर प्रमानपत्र स्विकारताना रक्तदाते(छाया-तुषार माने)
म्हासुर्णे:- तुषार माने 
       संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानामध्ये अग्रेसर व संपूर्ण देशात तसेच देशाबाहेरही रक्तदानाच्या व समाजसेवेच्या नावाने पोचलेल्या ब्लड डोनर सातारा या संस्थेचा तिसरा वर्धापनदिन संपन्न झाला.
        सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले व संस्थेच्या वतीने सर्वाना शासनाचे नियम पाळून रक्तदान करावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे व लॉक डाऊन च्या काळात कोणीही घराबाहेर  पडू नये सर्वानी आपल्या घरात सुरक्षित राहावे असे आवाहन संस्थेतर्फे सदस्य व नियमित रक्तदाते ह.भ.प.श्री. तुषार कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले व संस्थेच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

      ०८ एप्रिल २०१७ या दिवशी संस्थेचे अध्यक्ष श्री. हणमंत कुंभार साहेब,श्री. धनाजी यादव साहेब, श्री. बालाजी दादा आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून ब्लड डोनर,सातारा या सेवाभावी संस्थेची स्थापना केली  सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन सामाजिक कार्याची अविरत सेवा चालू ठेवली. एका छोट्याशा संस्थेचे रूपांतरण एका मोठ्या संस्थेत बदल करण्याचे महान कार्य हे आपण सर्व सदस्यांनी मिळून केले आहे. या संस्थेच्या कार्याचा विचार करता आज पर्यंत संस्थेकडून संपूर्ण राज्यात मिळून *४३४* एवढे रक्तदान झाले आहे. संस्थेने पूर्ण राज्यात मिळून आजपर्यंत *४६* रक्तदान शिबिराचे सफलतापूर्वक आयोजन केले आहे. बाहेरील देशाबद्दल बोलायचे झाले तर संस्थेच्या मार्फत *७* सदस्यांचे रक्तदान बाहेरच्या देशात झाले आहे. संस्थेने मागील वर्षापासून एक नवीन उपक्रम चालू केला तो म्हणजे 'प्लेटलेट्स डोनेशन'. या उपक्रमामध्ये आजअखेर *८१* जणांनी प्लेटलेट्स डोनेट केले आहे. संस्थेच्या मार्फत ४ गरजू लोकांना 32000 रुपयांची मदत झाली आहे. तसेच मागील वर्षी पूरग्रस्तांना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची मदत संस्थेने केली आहे. संस्थेच्या वतीने शालेय वस्तुंचे वाटप तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सोबत ध्वजारोहण साजरे करून खाऊ वाटप केले आहे आणि आता नव्याने फैलावत असलेल्या कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तीला संस्थेतर्फे  ब्लड तसेच अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. अशाप्रकारच्या सर्व सेवा संस्थेतर्फे गरजू व गरीब लोकांना गेली 3 वर्षे पूर्णपणे मोफत पुरवल्या जात आहेत व यातून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले जात आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष हणमंत कुंभार व सदस्य अय्याज मुल्ला यांनी दिली.
 वर्धापन दिनाच्या निमित्ताने
धनाजी यादव व इतर काही सदस्य यांनी आज कराड व सातारा या ठिकाणी रक्तदान केले व रक्तदान करून संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला.घरीच रहा , सुरक्षित रहा असा संदेश संस्थेतर्फे सर्व जनतेला दिला.