हातनूर जिल्हा परिषद शाळेचे इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत यश
हातनूर :
आय एस ओ 9001: 2008 नामांकन प्राप्त असलेली प्रकाशन संस्था सेंट्रल प्रकाशन मंदिर कोल्हापूरची इंडियन टॅलेंट सर्च परीक्षा राज्य स्तरावर दरवर्षी आयोजित केली जाते. ऐच्छिक असलेली ही परीक्षा पालकांच्या इच्छेवरून याही वर्षी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद हातनूर शाळेच्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. स्नेहा शशिकांत पाटील महाराष्ट्र राज्यात द्वितीय, संस्कृती संतोष सिंहासने राज्यात द्वितीय, अनुष्का उत्तम पाटील राज्यात चौथी, श्रेया सचिन पाटील राज्यात सहावी, नेहा परशराम पाटील राज्यात आठवी, श्रेया अजित पाटील जिल्ह्यात तिसरी, रिया सचिन पाटील जिल्ह्यात आठवी, असे यश मिळवले. ग्रामीण भागातून विद्यार्थी राज्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पालकांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांच्या 50 - 50 प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या होत्या. पाठ्यपुस्तकांचा दोन-दोन वेळा सराव घेऊन त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशन साहित्य हसत खेळत, माझी अभ्यासिका, घरचा अभ्यास, दिवाळी अभ्यास, शब्दकळी, शब्दतरंग, गारवेल, डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती, विद्याभारती, पंढरीनाथ राणे या सर्व संदर्भ साहित्यांचा उपयोग करण्यात आला. त्याचबरोबर अक्षरगंगा परीक्षेच्या 10, बीडीएस प्रश्नपत्रिका, टी एस सी प्रश्नसंच, आय टी एस ई प्रश्नसंच सोडवून घेण्यात आले होते. श्री शशिकांत पाटील हे या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत. बसलेल्या पैकी शंभर टक्के निकाल लागलेला आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनीही चांगले यश मिळवलेले आहे.
मुख्याध्यापक सुरेश संपतराव पाटील,शशिकला पाटील, कलावती कदम, ज्योत्स्ना पाटील ,वैशाली पवार, सुनिता कुंभार , ज्योती कापसे ,पदवीधर शिक्षक वसंतराव पाटील, प्रमोद कदम, महादेव जंगम, शशिकांत पाटील हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करीत आहेत.
हातनूर शाळा ही सर्व स्पर्धा परीक्षा आठवी एनएमएमएस, आठवी शिष्यवृत्ती, पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय, जिल्हा परिषद पतंगराव कदम शिष्यवृत्ती, खाजगी परीक्षा, याचबरोबर चित्रकला, कुस्ती, क्रीडा स्पर्धा, एकांकिका, नाट्य, नृत्य स्पर्धा यामध्ये सातत्याने यश मिळवीत आहे.
2024 साली जिल्हा परिषद शाळा हातनुर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करीत असून तोपर्यंत शाळेला आंतरराष्ट्रीय रूप देण्याचा शशिकांत पाटील, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षकांचा मनोदय आहे. यामध्ये केंद्रप्रमुख रमेश राऊत विस्ताराधिकारी शामल माळी प्रकाश कांबळे गटशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांचे सहकार्य लाभत आहे
0 Comments