जनतेने संयम पाळून संपर्क साधावा. शासनाच्या सूचनांचे पालन करावे;पालकमंत्री बाळासाहेब पाटील.
कराड - (सुरज बाबा घोलप)
संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसमुळे अघोषित असे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी स्वतःवर नियंत्रण राखून लोकांची काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वेळी सातारा जिल्ह्यातील जनतेने संयम पाळून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधींची संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. सहकारमंत्री असल्यामुळे राज्यातून लोक भेटायला येतात. निदान 31 मार्चपर्यंत लोकांनी लेखी सूचना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकार सध्या देशातील कोरोना वायरस थोपविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. महाराष्ट्रात नागरी भागात 144 कलम लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळून इतर गोष्टी 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. ही उपाययोजना असून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. आपापल्या घरी थांबून शक्यतो कोरोना व्हायरसशी संपर्क येवू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
0 Comments