हातनूर ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषयक जनजागृती.


हातनूर :-(शशिकांत भोरे)
                कोरोना’ विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. देशात सर्वाधिक बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये यासह गर्दी जमणारी ठिकाणी बंद करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अजून कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. मात्र भविष्यातील चिंता पाहता आठवडे बाजार, यात्रा-जत्रा, लग्नसोहळे यासह गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत, असे सांगतानाच ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्तरावर ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा ग्रामपंचायतींनी गावात ग्रामसभा घेऊन लोकांना ‘कोरोना’ विषाणूसंदर्भात माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदा ग्रामसभा घेण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून तासगाव तालुक्यातील हातनूर ग्रामपंचायतीने लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती मोहीम सुरु केली आहे. त्या मोहिमे अंतर्गत संपूर्ण गावात लाऊड स्पीकर च्या माध्यमातून कोरोना व्हायरस पासून आपली कशी काळजी घ्यायची तसेच घराच्या बाहेर पडू नका.गर्दी करू नका.अफवा वर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे.तसेच गावात कोरोना व्हायरस विषयी माहिती व त्यापासून कशी काळजी घ्यायची याबाबत माहिती असणारे  पत्रक व फलक लावण्यात आले आहेत..
             या जनजागृती मोहिमे मध्ये  ग्रामपंचायतील सर्व सदस्य  व  सरपंच  उपसरपंच  पोलीस पाटील  यांनी  सहभागी घेतला होता.