हातनूर मधील सामाजिक कार्यकर्ते विश्वास(आण्णा ) पाटील यांनी गावकऱ्यांना काळजी घेण्याचे केले आवाहन
हातनूर :(शशिकांत भोरे)
जगभरात कोरोनाचं सुरू असलेलं थैमान, देशात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या.तसेच भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत.आणि आता तर सांगली जिल्ह्यात 4 रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर हातनूर मधील सामाजिक कार्यकर्ते विश्वास(आण्णा ) विठ्ठल पाटील यांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच अफवावर विश्वास ठेऊ नका.स्वच्छता राखा काळजी घ्या.परगावाहून आलेल्या गावातील लोकांना त्यांच्या घरातील लोकांनी बाहेर सोडले नाही पाहिजे.बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी कुठून आलो याची माहिती ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आणि पोलीस पाटील यांना द्यावी.प्रत्येक घरातील कर्त्या माणसाने आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणू विषयी माहिती द्यावी.गावातील पानपट्टी तसेच इतर व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करू नये (बाहेरून येऊन व्यवहार करतात पैशाची देवाण-घेवाण करतात). कोरोना विषयी अफवा पसरवू नये दुसऱ्याच्या ऐकलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नयेबा.बाहेरगावाहून आलेल्या लोकांना घरातून बाहेर पडू देऊ नये किमान 14 दिवस.गावातील लोकांनी बाहेर पडू नये दुसऱ्या गावी जाऊ नये.प्रशासनाला मदत करावी.कुणाशी बोलताना किमान एक मीटर म्हणजेच तीन फूट अंतर ठेवून बोलावे हस्तांदोलन टाळावे.बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात, पाय, तोंड धुवावे. आपल्याबरोबर कुटुंबाची त्याचबरोबर मित्र परिवाराचे, गावकऱ्यांची काळजी घ्यावी.
बाहेरगावावरून आलेल्या लोकांनी शक्यतो जास्त काळजी घ्यावी बाहेर फिरू नये.
खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात धरावा.हा महाभयंकर जोड विषाणू आहे मला काय होईल? या भ्रमात राहू नये.आपले जीवन अनमोल आहे, आपण सर्वांनी काळजी घ्यावी असे नम्र आवाहन विश्वास आण्णा पाटील यांनी हातनूर करांना केले.
0 Comments