सांगली जिल्ह्यात इस्लामपूर मध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले.
सांगली / इस्लामपूर : सिद्धार्थ कुरणे
कोरोना विषाणूचा संसर्ग अखेर सांगली जिल्ह्यात येवून पोहोचला आहे . कोरोनाची लागण झालेले चार रुग्ण इस्लामपुरात सापडले आहेत . हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत . ही माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत चौधरी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . संजय साळंखे , जिल्हा आरोग्याधिकारी डॉ . भूपाल गिरीगोसावी यांनी दिली . यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे . लोकांतही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाची धास्ती सुरु आहे . जिल्हा प्रशासनाने याच्या प्रतिबंधासाठी तातडीने पावले उचलली . सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे . सर्वव्यापार , उद्योग बंद केले केले आहेत . जनता कयूँही आयोजित करुन कोरोनाचा संसर्ग थांबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नाकाबंदी करुन वाहने तपासूनच सोडली जात आहेत . इतर शहरे व परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे . लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला विलगीकरण , आयसोलेशन कक्षात तातडीने पाठविले जात आहे . गंभीर असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात आहेत . यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती काहीशी नियंत्रणात वाटत होती . आजअखेर जिल्ह्यात एक पण आज आयसोलेशन कक्षात दाखल असलेल्या ७पैकी चौघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे . हे लोक शनिवार , दि . १४ सौदी अरेवियातन आले आहेत . त्यांना तालका प्रशासनाने होम वारंटाईनची सक्ती केली होती . तरीही हे लोक घराबाहेर वावरत होते . त्यामुळे प्रशासनाने पोलिसाकरवी त्यांना दोन वेळा नोटीस पाठविली होती . पण यांनी याकडे लक्ष दिले नाही . त्यानंतर हे सर्वजण आजारी पडले . त्यामुळे त्यांना उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांना मिरज येथे अॅडमिट करण्यात आले . वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची संशयित लक्षणे वाटल्याने त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते . आज या चौघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . यात दोन महिला व दोन पुरुष आहेत . हे सर्वजण ६५ , ६२ , ५२ व ३५ वर्षांचे आहेत . यांच्यावर उपचार सुरु असून फारसा धोका नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले . ।सांगली जिल्ह्यातील 4 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह सांगली जिल्हाधिकारी *मा.डाॅ. अभिजीत चौधरी साहेब* यांच्या अत्यावश्यक महिती . घाबरू जाऊ नका तरी स्वतःला सांभाळून राहणे गरजेचे आहे.
0 Comments