कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची अधिसूचना झाली.
नाशिक :-
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे कांदा निर्यात बंदी उठवण्याची खुशखबर शेतकऱ्यांना दिली. पण प्रत्यक्षात त्याची अधिसूचना पाच दिवसानंतर जारी केली आहे. कांद्याची निर्यात 15 मार्च नंतर खुली होणार आहे.निर्यातीसाठी कोणत्याही अटी शर्ती लागू केलेले नाहीत. कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपये दरवाढ झाली. मात्र अधिसूचना जारी होत नाही म्हटल्यावर कांद्याच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांनी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप होता.
0 Comments